Thursday, March 28, 2024

/

पोलीस -बस कंडक्टरची चक्क भररस्त्यात हाणामारी!

 belgaum

पोलीस -बस कंडक्टरची चक्क भररस्त्यात हाणामारी!दिवसाढवळ्या भर रस्त्यामध्ये रहदारी पोलीस आणि बस कंडक्टर यांच्यात हाणामारी झाल्याची घटना आज शहरात घडली असून हा चर्चेचा विषय झाला आहे.

शहरातील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे एका ठिकाणी बस थांबवल्यावरुन रहदारी पोलीस आणि केएसआरटीसी बस कंडक्टर यांच्यात आज सकाळी वादावादी झाली.Traffic police

यावेळी दोघांनी एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळ सुरू केल्यामुळे वादावादीचे पर्यवसान हाणामारीतमध्ये झाले. परिणामी दोघांच्यामध्ये चांगलीच जुंपली. भर रस्त्यात सुरू असलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली.

 belgaum

पोलिसांच्या बाबतीत आधीच नाखूष असलेले नागरिक मोठ्या चवीने रस्त्यावरील पोलिस व बस कंडक्टर यांच्यातील झोंबाझोंबी आणि ठोसाठोशीचा प्रकार पाहताना दिसत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.