Friday, April 26, 2024

/

निवडणूक नोडल अधिकाऱ्यांची बैठक-तक्रारींची त्वरित दखल घ्या : जिल्हाधिकारी

 belgaum

निवडणुकी ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते. निवडणुकीच्या बाबतीत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घेऊन निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व काही सुरळीत झाले पाहिजे. यासाठी सर्वांनी काळजीपूर्वक तत्परतेने कार्य करावे, अशी सक्त सूचना नूतन जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी दिली.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आज बुधवारी सकाळी आयोजित निवडणूक नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेच्या बाबतीत कोणत्याही कारणास्तव हयगय होता कामा नये काही शंका असल्यास प्रशिक्षणादरम्यान त्यांचे निरसन करून घ्यावे निवडणुकीसाठी नियुक्त सर्व पथकांनी समर्पकपणे आपले कार्य पार पाडावे.

आचारसंहितेत संदर्भात कोणतीही तक्रार आल्यास तिची दखल घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट घेऊन पत्रकारितेचे निवारण केले जावे निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये कोरोना मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन केले जावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी बारीक लक्ष ठेवावे थोडक्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि यशस्वीपणे पार पडावी यासाठी आवश्यक ते सर्व क्रम हाती घेतले जावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी दिली.Nodal officer meeting

 belgaum

निवडणूक काळात कोणतेही नवीन कामे हाती घेऊ नयेत. आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होण्यासाठी 40 व्हिडिओ सर्व्हिलन्स पथके व 50 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाणार आहे. निवडणुकीशी संबंधित असणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला त्वरित प्रारंभ करावा अशी सूचनाही त्यांनी केली.

निवडणुक आयोगाच्या सूचनांनुसार ग्रामपंचायत, महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्था अशा एकुण 511 मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अधिकारी अमरनाथ रेड्डी तसेच उपविभागीय अधिकारी रवींद्र कर्लींगनावर, शशिधर बगली, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे, जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. एस. बी. मुन्याळ, एन. व्ही. शिरगावकर, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. बाळकृष्ण तुक्कार आदींसह निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.