Thursday, April 25, 2024

/

विवेकराव पाटील यांचा लखन जारकीहोळीना पाठिंबा

 belgaum

बेळगाव बेळगाव जिल्ह्यातील विधान परिषदेच्या दोन जागासाठी आज मंगळवारी अर्ज भरणाऱ्या शेवटच्या दिवशी 9 जणांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी आणि काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी या दोघांनी शक्ती प्रदर्शनासह तर भाजपचे महांतेश कवटगीमठ आणि आपचे उमेदवार शंकर हेगडे आणि आणखी सहा औपचारिकता म्हणून मोजक्या समर्थकांसह अर्ज दाखल केला.  अर्ज भरणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या 10 झाली आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसने तिकीट डावलले आणि भाजपच्या वाटेवर असलेले विवेकराव पाटील यांनी आज लखन जारकीहोळी यांना जाहीर पाठिंबा दिला.

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी झाली. होती. हजारोच्या संख्येने लखन जारकीहोळी यांचे समर्थक बेळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आले होते. तर काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी यांनी देखील समर्थक जमवले होते चन्नराज हट्टीहोळी यांनी अर्ज भरायच्या अगोदर सुळेभावी येथील श्री महालक्ष्मी मंदिरमध्ये विशेष पूजन केलं आणि त्यानंतर अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत त्यांच्या भगिनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार अंजलीताई निंबाळकर, केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी आदी उपस्थित होते.

 belgaum

लखन जारकीहोळी यांनी आज मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केलं. प्रारंभी त्यांनी शहरातील कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील श्री गणेश मंदिरात जाऊन विशेष पूजा केली. त्यानंतर सर्कलमधील वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांचा पुतळा, आंबेडकर भवनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, गोवावेस येथील श्री बसवेश्वर यांचा पुतळा, शहापूर शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच क्रांतिवीर संगोळी रायान्ना यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जारकीहोळी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. लखन जारकीहोळी यांचे ज्येष्ठ बंधू आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी त्यांच्यासाठी भाजपकडे दुसऱ्या उमेदवारीची मागणी केली होती. मात्र त्यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. विशेष म्हणजे मागील विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी झालेले विवेकराव पाटील यांनी आज लखन जारकीहोळी यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. त्यामुळे बरीच समीकरणे आता बदलणार आहेत.Lakhan nomination

लखन जारकीहोळी यांना संपूर्ण पाठिंबा देताना आज अर्ज दाखल करतेवेळी काँग्रेसने तिकीट डावलले आणि भाजपच्या वाटेवर असलेले विवेकराव पाटील हे स्वतः जातीने हजर होते. त्यांच्यासमवेत अंबीरराव पाटील व रमेश जारकीहोळी यांचे सुपुत्र अमरनाथ हे देखील हजर होते.

दुसरीकडे भाजपचे अधिकृत उमेदवार महांतेश कवटगीमठ यांनी मोजक्या लोकांसमवेत उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी मंत्री उमेश कत्ती व माजी मंत्री रमेश जारकीहोळी आदी जिल्ह्यातील आमदार यांनी हजेरी लावली होती. याव्यतिरिक्त आम आदमी पार्टी अर्थात आपकडून शंकर हेगडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या पद्धतीने विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी एकंदर चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.