Tuesday, March 19, 2024

युवकावर प्राणघातक हल्ला -कल्लेहोळ क्रॉस जवळील घटना

 belgaum

बियरच्या बाटलीने डोक्यात वार करून एका युवकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बेळगाव वेंगुर्ला रोडवर कल्लेहोळ क्रॉस जवळ बुधवारी मध्यरात्री 2 ते 4 च्या दरम्यान घडली आहे.

रामचंद्र कणबरकर वय 29 रा. उचगाव असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. सदर गंभीर जखमी युवकाला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

या घटने बाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार रामचंद्र हा बुधवरी रात्री कल्लेहोळ क्रॉस येथे जेवणासाठी गेला होता जेवण आटोपून परतते वेळी तो कल्लेहोळ क्रॉस येथे थांबला असता पाठीमागून अज्ञाता कडून त्याच्या डोक्यात बियरच्या बाटलीने वार करण्यात आला. या घटनेत तो गंभीर जखमी बेशुद्ध अवस्थेत तिथंच पडला होता.

 belgaum

गुरुवारी सकाळी मॉर्निंग वाकर्सनी त्यांला बेशुद्धावस्थेत पाहून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले.काकती पोलीस स्थानकात हे प्रकरण दाखल झाले आहे.

घटनास्थळी ए सी पी गणपती गुडाजी काकती पोलीस निरीक्षक गुरुनाथ घटनास्थळी जाऊन पहाणी केली.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Popular Articles