belgaum

कॉन्स्टेबल प्रवेश चाचणीत इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून कॉपी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

.या प्रकरणी खडेबाजार आणि कॅम्प अशा दोन पोलिस स्थानकामध्ये दोन स्वतंत्र उमेदवारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे .

bg

आज कर्नाटक राज्य पोलिस दलाच्या वतीने सिव्हिल पोलिस कॉन्स्टेबल भरती साठी सीईटी परीक्षा घेण्यात आली. यावेळी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून दोन उमेदवार कॉपी करत असल्याचे निदर्शनास आले.

परीक्षा केंद्रांमध्ये हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित परीक्षा केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली असून अशाप्रकारे कॉपी करणाऱ्या उमेदवारांना कारवाईचा सामना करावा लागणार आहे .

दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर आता पोलीस होण्यापूर्वीच पोलिस कारवाईचा सामना त्यांना करावा लागणार आहे.

 classic belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.