Friday, March 29, 2024

/

चार दिवसांपासून ‘ही’ तरुणी आहे बेपत्ता

 belgaum

टिळकवाडी गल्ली, कुद्रेमनी (ता. जि. बेळगाव) येथील एक तरुणी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. तिच्या वडिलांनी बुधवारी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

अक्षता लक्ष्मण बिजगर्णीकर (वय 19) असे बेपत्ता तरुणीचे नांव आहे. गेल्या सोमवार दि. 18 ऑक्टोबर रोजी सकाळी कॉम्प्युटर क्लासला जाण्यात जाते असे सांगून अक्षता कुद्रेमनी येथील आपल्या घरातून बाहेर पडली, ती अद्याप घरी परतलेली नाही. तिचे वडील लक्ष्मण इराप्पा बिजगर्णीकर यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.bijagarni-village-belgaum-girl-missing-akshata-

अक्षता ही 5.6 फुट उंचीची असून गहू वर्णीय आणि अंगाने सुदृढ आहे. घराबाहेर पडताना तिने पिस्ता रंगाचा चुडीदार व गुलाबी पॅन्ट परिधान केली होती.

 belgaum

अक्षताला मराठी व हिंदी भाषा येते. सदर वर्णनाची तरुणी कोणाला आढळल्यास अथवा तिच्याबद्दल माहिती असल्यास संबंधितांनी काकती पोलीस स्थानकाची संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.