Monday, May 6, 2024

/

संजय पाटील यांचे घुमजाव

 belgaum

मी मराठी माणसे किंवा मराठी भाषेच्या विरोधात नाही. मी हिंदू तत्त्वाने वागणारा माणूस आहे सर्व प्रकारच्या संस्कृती,जाती,धर्म आणि भाषांचा आदर करणारा माणूस असून मी मराठीचा कोणत्या प्रकारे अपमान केलेला नाही.

असे घुमजाव माजी आमदार संजय पाटील यांनी केले आहे .
रात्रीच्या वेळी फलक कोणी लावले तर ते भाजपच्या लोकांनी नसून मराठी माणसाने लावले असे स्पष्ट विधान केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या माजी आमदार संजय पाटील यांना आता उपरती झाली आहे. आणि त्यांनी आपले विधान मागे घेऊन एकंदर घुमजाव केले आहे.

एक आनंदीबाई ध चा मा करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तीच्यावर विश्वास ठेवू नका. अशा शब्दात त्यांनी पुन्हा एकदा नाव न घेता आपल्या प्रतिस्पर्धी आमदारांवर टीका केलो आहे.

 belgaum

त्याचबरोबरीने आपण आमदार असताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, राजहंस गडाबद्दल तसेच शासकीय स्वरूपात शिवजयंती साजरी होण्याबद्दल जे काही प्रयत्न केले आहेत ,ते सर्व मराठी जनतेला माहीत असल्यामुळे मी मराठीचा अपमान केला असा समज पसरवणे हे आता हसावे कि रडावे असा प्रश्न त्यांनी केला आहे .

जर कोणाचे मन दुखावले असेल तर शंभर वेळा माफी मागतो असे संजय पाटील म्हणाले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.