Monday, May 6, 2024

/

मंदिरासाठी भरीव देणगी दिल्याबद्दल ‘यांचा’ सत्कार

 belgaum

श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यासाठी 2 लाख 51 हजार रुपयांची भरीव देणगी देणारे शहरातील सुप्रसिद्ध श्री  जय गणेश साडी सेंटरचे मालक लक्ष्मणदास वाधवा, संतोष वाधवा आणि दीपक वाधवा यांच्यापैकी लक्ष्मणदास यांचा मंदिराच्यावतीने सत्कार करण्यात आला.

श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यासाठी कै. श्रीमती मीनादेवी लक्ष्मणदास वाधवा यांच्या स्मरणार्थ बेळगावमधील लोकप्रिय श्री जय गणेश साडी सेंटरचे मालक प्रसिद्ध उद्योजक लक्ष्मणदास वाधवा, संतोष वाधवा आणि दीपक वाधवा यांच्याकडून 2,51,000 रुपयांची देणगी देण्यात आली आहे.

या दानशूरपणाबद्दल मंदिराच्यावतीने लक्ष्मणदास वाधवा शाल -श्रीफळ देऊन कपिलेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सुनिल बाळेकुंद्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 belgaum

यावेळी राकेश कलघटगी, राजू भातकांडे, अभिजीत चव्हाण, राहुल कुरणे, प्रसाद बाचुळकर, राजू पाटील, शिवम बाचुळकर, विवेक पाटील आदी ट्रस्टी सेवेकरी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.