Thursday, March 28, 2024

/

पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

 belgaum

अथणी ग्रामीण पाणीपुरवठा आणि निर्मल्य खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि कार्यालय व्यवस्थापक अशा दोघा जणांना लाच स्वीकारताना भ्रष्टाचार निर्मूलन पथकाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे.

अथणी ग्रामीणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता राजेंद्र इंद्रप्पा वर्णाकर आणि कार्यालय व्यवस्थापक दीपक कृष्णाजी कुलकर्णी अशी एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या अधिकाऱ्यांची नांवे आहेत. एका ठेकेदाराकडून 68 हजार रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी या उभयतांना रंगेहात पकडून अटक केली असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

पाणी पुरवठा खात्याच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामाचे कंत्राट मिळवून देण्यासाठी सदर अधिकाऱ्यांनी बेळगावच्या एका ठेकेदाराकडे कंत्राटाच्या 3 टक्के रकमेची मागणी केली होती.

 belgaum

यासंदर्भात ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार नोंदविली होती. या तक्रारीची दखल घेऊन एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून वर्णाकर व कुलकर्णी यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

एसीबीचे जिल्हा पोलीस प्रमुख बी. एस. न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस प्रमुख करूनाकर शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली इन्स्पेक्टर गळाद, अडिवेश गुडीगोप्प, सुनील कुमार आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी उपयुक्त धाडीची कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.