belgaum

आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सीमा प्रश्नासाठी झगडलेल्या आणि सीमा भागातच आपला शेवटचा श्वास सोडलेल्या बॅरिस्टर नाथ पै यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आर.पी.डी. कॉलेजतर्फे त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा विशेष कार्यक्रम आज सकाळी पार पडला.

टिळकवाडीतील आरपीडी कॉलेजच्या के. एम. गिरी सभागृहात आज शनिवारी सकाळी आयोजित सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.के.ई. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, विनय याळगी आणि शेवंतीलाल शहा यांच्यासह आर.पी.डी. कॉलेजच्या प्राचार्य शोभा नाईक व्यासपीठावर उपस्थित होत्या.

bg

प्रारंभी विद्या याळगी यांच्या जयस्तुतेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नुपूर रानडे या विद्यार्थिनीने ईशस्तवन सादर केल्यानंतर उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक झाले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते बॅरिस्टर नाथ पै यांच्या या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्याद्वारे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी परशुरामभाऊ नंदीहळ्ळी व विनय याळगी यांनी बॅ. नाथ पै यांच्या स्मृतींना उजाळा दिला. Rpd college

बॅ. नाथ पै ही फार मोठी असामी होती. त्यांनी संपूर्ण भारताचा प्रवास केला होता. त्यामुळे त्यांच्यापाशी देशभरातील सामाजिक व राजकीयतेचा प्रचंड व्यासंग होता. कोठेही अन्याय होत असेल तर तो दूर झाला पाहिजे अशा मताचे ते होते. बेळगावचा सीमाप्रश्न सुटावा यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत यांनी प्रयत्न केले. बॅरिस्टर नाथ पै यांची लोकशाहीवर प्रचंड निष्ठा होती आदी गोष्टींवर कार्यक्रमात अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. किरण ठाकूर यांनी अध्यक्षीय समारोप केला.

कार्यक्रमास जीएसएस कॉलेजचे प्राचार्य मजुकर, आरपीडी पीयु कॉलेजचे प्राचार्य मेळद, नाथ पै यांचे जवळचे नातलग प्रा. अनिष पाटणकर, डॉ सुषमा पाटणकर आदींसह आरपीडी व जीएसएस कॉलेजचा प्राध्यापक वर्ग, पै कुटुंबीयांचे हितचिंतक आणि विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. जगदीश कुंटे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.