Thursday, April 25, 2024

/

मराठा मंदिरात पराभूत उमेदवारांची बैठक

 belgaum

मनपा निवडणूक प्रक्रियेत अनपेक्षित निकाल संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी सर्व पक्षीय माजी नगरसेवक व पराभूत उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली आली आहे.

मंगळवारी सायंकाळी 4 वाजता रेल्वे ओव्हर ब्रिज मराठा मंदिरात सदर बैठक आयोजित करण्यात आली आहे

सोमवारी मनपा निवडणूकीचे निकाल लागताच अनेक पराभूत उमेदवारांनी काल रात्री जिल्हाधिकारी यांना निवेदन देत निवडणूक प्रक्रिया सदोष झाल्याचा आरोप केला होता.

 belgaum

मराठा मंदिरात होणाऱ्या बैठकीत माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदन संदर्भात, तसेच कालच्या अनपेक्षित निकाला संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी नगरसेवक तसेच महानगर पालिकेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्व भाषिक उमेदवारांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगरसेवकांच्या वतीने करण्यात आले आहे.

पराभूत उमेदवार निवडणूक निकाला विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.