Friday, March 29, 2024

/

सार्वजनिक गणेशोत्सवाचे ऐतिहासिक केंद्र बेळगाव

 belgaum

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात बेळगावचे एक वेगळे स्थान आहे कारण इथेच गणेशोत्सव पुण्यानंतर प्रथम सार्वजनिक कार्यक्रम म्हणून साजरा केला गेला होता. प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनीच त्याचा पाया रचला होता.

लोकांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी शहरात सार्वजनिक गणेश मूर्तींची स्थापना सुरू झाली. स्वातंत्र्यसैनिक गोविंदराव याळगी आणि गंगाधरराव देशपांडे यांनी ब्रिटिशांशी लढण्यासाठी सर्व धर्माच्या लोकांना एकत्र करण्याच्या हेतूने 1905 मध्ये सार्वजनिक उत्सव म्हणून गणेशोत्सवाची योजना केली.

गोविंदराव यळगी यांच्या निवासस्थानी पहिली सार्वजनिक गणेशमूर्ती बसवण्यात आली. टिळकांनी लोकांना एकत्र करण्यासाठी पुण्यात सार्वजनिक गणेश मूर्तींच्या स्थापनेला सुरुवात केली होती आणि बेळगावकरांनी, स्वातंत्र्य लढ्याच्या निमित्ताने एकजुटीसाठी एकत्र येण्याचा मार्ग दाखवला. बाजारपेठेत असलेल्या पहिल्या गणेश मूर्तीची स्थापना केली. ब्रिटिशांनी टिळकांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवल्याने त्यांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर लगेचच ठिकाण सोडले.
एक दुवा म्हणून लोकांना गणेशोत्सवाची जोड देण्याचा वारसा पुढे चालू आहे आणि एकता दाखवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा आजही सुरू आहे.

 belgaum

Tilak ganesh bgm
1905 मध्ये स्थापित केलेली सार्वजनिक मूर्ती कर्नाटकातील पहिली आणि पुण्यानंतर भारतात दुसरी आहे. सन 1905 पासून, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, मार्केट, विविध धर्मातील लोकांबरोबर सण साजरे करणे आणि प्रत्येक वर्षात भव्यता वाढवणे हे एकता आणि अखंडतेचे आदर्श उदाहरण म्हणून उभे राहिले आहे.

धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. तरुणांमध्ये ‘आरोग्य ही संपत्ती आहे’ हा संदेश देण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धा देखील आयोजित केली जाते.
2005 पासून, मंडळ लोकांकडून देणग्या गोळा करत नाही परंतु ठेवी आणि प्रायोजकांकडून मिळणाऱ्या व्याजातून उत्सवाचा खर्च सांभाळला जातो. 10 दिवसांच्या उत्सवांमध्ये दररोज 1 लाखांहून अधिक लोक पंडालला भेट देतात. मागील दोन वर्षात कोरोना च्या नियमांमुळे यात खंड पडला आहे.
गणेश उत्सव मंडळांची संख्या हळूहळू वेगवेगळ्या उपनगरांमध्ये आणि परिसरात वाढू लागली आणि त्यापैकी प्रत्येकाने मूर्ती बरोबरच इतर देखवेही आकर्षक पद्धतीने सादर करण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला. काही मंडळांनी शतकी तर अनेक मंडळांनी अर्धशतकी परंपरा पूर्ण केली आहे.
शहरातील प्रत्येक उपनगरात आता एक गणेश उत्सव मंडळ आहे आणि काही गल्ल्यांमध्ये दोन मूर्ती दोन्ही टोकाला बसवल्या जातात. अगदी नवीन लेआउट आणि गल्ल्यांनीही गणेशमूर्ती बसवण्यास सुरुवात केली आहे आणि शहराच्या हद्दीत ही संख्या 400 च्या घरात नेली आहे. या व्यतिरिक्त, शहराच्या बाहेरील गावे देखील शहरी भागांशी स्पर्धा करत आहेत.

केरोसिन लावलेल्या दिव्यांपासून ते आधुनिक एलईडीच्या रोषणाईपर्यंत, गणेश मंडपांमध्येही पारंपारिक सजावटींपासून ते आधुनिक सजावटींमध्ये बदल झाले आहेत. माङो शहरभरातील प्रसिद्ध मंदिरांचे आकार घेत आहेत. अलिकडच्या वर्षांत गणेश मूर्तींचा आकार वाढला असून 10 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती रूढ झाल्या होत्या मात्र कोरोना नियमांनी सध्या मूर्तींची उंची कमी केली आहे.

शहरात गणेश उत्सव साजरा करणाऱ्यांची तिसरी आणि चौथी पिढी कार्यरत असल्याचा अभिमान आहे. काही मंडळे एकाच मूर्ती बनवणाऱ्या कुटुंबाला जोडलेली असताना, अलीकडच्या काही वर्षांत महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर येथूनही त्यांच्या आवडीच्या मूर्ती आणल्या जातात आहेत.
संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचा विचार करता एकूण स्थापित मूर्तींची संख्या 4000 चा आकडा पार करून गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.