कपिलेश्वर उड्डाणपूल श्री शनी मंदिरपासून हेमू कलानी चौकापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाल्याची घटना आज सकाळी घडली. मात्र श्री कपिलेश्वर मंदिरातील सेवेकर्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर देवस्थानमध्ये आज सकाळपासून पहिल्या श्रावण सोमवारची लगबग सुरू होती. यावेळी येणाऱ्या भाविकांकडून माहिती मिळाली की कपिलेश्वर उड्डाणपूल श्री शनी मंदिर आणि हेमू कलानी चौक येथे ट्राफिक जाम अर्थात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.
त्यावेळी श्री कपिलेश्वर ट्रस्टने आपले सेवेकरी पाठवून वाहतूक सुरळीत केली आणि नागरिकांची वाहतूक कोंडीपासून सुटका केली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मंदिराचे सेवेकरी सचिन आनंदाचे, ओमकार पोटे, अजित पोटे, आकाश देवर, आदित्य काकतकर, अभिषेक मारदोलकर आदींनी पोलिसांना सहकार्य केले.
दरम्यान, विकेंड लॉक डाऊन खुला झाल्यानंतर आज सोमवारी सकाळी शहरात एकच गर्दी उसळली होती. परिणामी नरगुंदकर भावे चौक गणपत गल्ली या ठिकाणी तब्बल 2 तास वाहतुकीची कोंडी झाली होती.
या ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यासाठी रहदारी पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. नरगुंदकर भावे चौक येथे वाहतूक कोंडी झाल्यामुळे मारुती गल्ली, गणपत गल्ली, आणि रविवार पेठ भागातील रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.दर सोमवारी ट्रॅफिक जाम होण्ययाच जणू काही परंपरा कायम झाली आहे ती आजही तशीच होती.