Sunday, April 28, 2024

/

बेळगाव मनपा निवडणुकीची घोषणा

 belgaum

राज्यातील बेळगावसह हुबळी -धारवाड आणि गुलबर्गा अशा एकूण तीन महानगरपालिकांच्या निवडणुकांची राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. निवडणुकीचे मतदान 3 सप्टेंबर रोजी होणार असून मतमोजणी 6 सप्टेंबर रोजी होणार आहे

बेळगाव महानगरपालिकेतील 58 वार्ड, गुलबर्गा महापालिकेमधील 55 आणि हुबळी धारवाड महापालिकेच्या 82 वार्डात ही निवडणूक होणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता येत्या 16 ऑगस्ट रोजी याची लागू होणार असून नामांकन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट असणार आहे.

अर्जांची छाननी 24 ऑगस्ट रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट ही असणार आहे. निवडणुकीचे मतदान 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होईल.

 belgaum

त्याचप्रमाणे मतमोजणी 6 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव नागराजू एन. आर. यांनी एका आदेशाद्वारे उपरोक्त निवडणुकीची घोषणा केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.