” *शिक्षक हा संस्कारमय पिढी घडवणारा असतो. शालेय जीवनातील विद्यार्थी शिक्षण घेऊन आज समाजामध्ये आपली पत निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या नावासमोर उपाधी धारण करून आपली ओळख निर्माण करावी . चांगलं जीवन जगत असाताना सामाजिक जाणिव ठेवून सर्वांशी ऋणानुबंध रहावे* .असे प्रतिपादन अध्यक्षस्थानावरून बोलताना या शाळेचे माजी मुख्याध्यापक व सीमाकवी रविंद्र पाटील यांनी प्रतिपादन केले.
बसवन कुडची येथे 2002 मध्ये दहावीच्या वर्गात शिकलेल्या श्री कलमेश्वर हायस्कूल माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला यावेळी अध्यक्षस्थानी सीमाकवी रवींद्र पाटील .
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने करण्यात आली . यानंतर सर्व माजी शिक्षक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले .
माजी विद्यार्थ्यांचा हा स्नेहमेळावा ऋणानुबंध एक आठवण म्हणुन एकोणीस वर्षानंतर हा स्नेहमेळावा दि .२५ रोजी बसवण कुडची येथे आयोजित करून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळावा मित्र- मैत्रिणी यांच्यात एक संवाद व्हावा व गुरुजन ही आपले या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी हा स्नेहमेळवा घेण्याचा हेतू प्रास्ताविकातून किरण पाटील यांनी विशद केला .
यावेळी उपस्थित शिक्षक रवींद्र पाटील ,जोतिबा मुतगेकर , बसवराज दिवटे , पाटोळे सर , क्रीडाशिक्षक बाळाराम जैनोजी ,सुजाता दिवटे -अक्षीमणी व तुकाराम वडगावकर या गुरुजनांचा विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल ‘स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
तसेच सर्व मान्यवर गुरुजन यांची ही मार्गदर्शनपर भाषणे झाली .
यावेळी मंदाकिणी मुचंडीकर ,सतीश बेडका , सागर सावकार , चंद्रकांत हिंडलगेकर , उमेश दिवटे , रवी हाळबाचे , शीतल दिवटे यानी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी सुषमा गिरी , अनिता चौगुले , लक्ष्मण बेडका , जोतिबा जोडगुंजे , विकास बेडका , शिवाजी बेडका , मनोज पाटणेकर , अरुण पालेकर , सुधीर खोकलेकर , सिद्धाप्पा बेडका , मंजुळा लोहार यासह आदी माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला उपस्थित होते .
सुत्रसंचलन मंदाकिणी मुचंडीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश बेडका यांनी मानले.