Friday, March 29, 2024

/

*डायग्नोस्टीक सेंटरकडून अवाजवी पैसे वसुली विरोधात जायंट्सची मोहीम*

 belgaum

बेळगाव शहरातील डायग्नोस्टीक सेंटरवर सिटी स्कॅन करण्यासाठी अवाजवी बीलाची आकारणी करत असल्याची माहिती मिळताच जायंट्स मेनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आदित्या एक्सेल या डायग्नोस्टीक सेंटरवरचा
पोलखोल केला.

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाने असंख्य रूग्णांना एचआरटीसी स्कॅनिंग करणे गरजेचे झाले असताना स्कॅनिंग सेंटरकडून लुबाडणूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने सरकारने दर निर्धारित करून दिले आहेत.

बेळगाव शहरात गेल्या दोन महिन्यात अनेक स्कॅनिंग सेंटरमधून हजारो लोकानी स्कॅनिंग करून घेतले पण सरकारने ठरवल्या नुसार दर आकारणी न करता साडेतीन हजार रुपये घेऊन लुबाडणूक चालल्याच्या तक्रारी जायंट्स मेनच्या पदाधिकाऱ्यांच्याकडे आल्याने होत्या त्यानंतर लागलीच अध्यक्ष संजय पाटील, विभागीय संचालक मदन बामणे, सचिव विजय बनसुर, लक्ष्मण शिंदे,राजू बांदिवडेकर, सुनिल मुरकुटे, प्रकाश कुलकर्णी आदींनी क्लब रोड येथील आदित्या एक्सेल या स्कॅनिंग सेंटरला भेट दिली असता तिथे साडेतीन हजार रुपये आकारत असल्याचे रुग्णांकडून समजले पण तेथील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले आणि आम्ही कमी पैसे घेतोय असे सांगू लागले.Giants

 belgaum

पण चढ्या आवाजात बोलताच सत्य काय आहे ते सांगितले आणि आजपासून अडीच हजार रुपये घेतो असे सांगितले पण जायंट्स पदाधिकाऱ्यांचे एवढ्यावर समाधान न झाल्याने त्यांना अडीच हजार दर असल्याचे पत्रक लावण्यास भाग पाडले आणि जादा आकारणी केलेले पैसे रुग्णांना परत देण्यास सांगितले.

यावेळी अध्यक्ष संजय पाटील यांनी प्रशासनाने अशा गोष्टीत लक्ष घालून गरीब रुग्णांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.