Wednesday, May 1, 2024

/

ऑक्सिजन प्लांटला सतीश जारकीहोळींनी दिली भेट

 belgaum

केपीसीसी कार्याध्यक्ष आणि आमदार सतीश जारकीहोळी यांनी काकती येथील बेळगाव ऑक्सिजन प्लांटला शुक्रवारी सायंकाळी भेट दिली.

यावेळी ऑक्सिजन सिलिंडर चा संग्रह आणि क्षमतेची पाहणी केली. या प्लांटला होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात सतीश जारकीहोळींनी चौकशी केली.

यासंदर्भात सहायक औषध नियंत्रक रघुराम यांच्याशी सतीश जारकीहोळींनी चर्चा केली. कारखान्यात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडरचा संग्रह करणे, योग्य रीतीने त्याचे वितरण करणे, कोणत्याही निष्काळजीविना ऑक्सिजन पुरवठा योग्य पद्धतीने करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या.Oxygen plant

 belgaum

तसेच ऑक्सिजन पुरवठा दरम्यान किंवा संबंधित कोणतीही अडचण असल्यास त्वरित आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सतीश जारकीहोळींनी केली.

यावेळी वेंकटेश पाटील, जिल्हा पंचायत सदस्य सिद्दू सुनगार, जिल्हा युवा काँग्रेस घटकचे उपाध्यक्ष सिद्दीकी अंकलगी आणि काकती ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.