Friday, April 26, 2024

/

हिंडलगानजीक शेत जमीन आगीच्या भक्ष्यस्थानी

 belgaum

हिंडलगा गावानजीक सुळगा -हिंडलगा रस्त्याशेजारील एका शेताला मोठ्या प्रमाणात लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करावे लागल्याची घटना आज दुपारी घडली.

हिंडलगा -सुळगा रस्त्यावरील हिंडलगा गावानजीक असणाऱ्या शिवाजीराव सरप यांच्या मालकीच्या गेल्या एक -दोन वर्षांपासून पडीक असलेल्या दोन एकर शेतजमिनीतील गवत आणि झाडाझुडपांना आज दुपारी चारच्या सुमारास अचानक आग लागली. पालापाचोळा, झाडेझुडपे आणि वाढलेल्या गवतामुळे ही आग अल्पावधीत झपाट्याने शेतभर पसरली. मोठ्या प्रमाणात लागलेल्या आगीमुळे झाडावरील पक्षांचा सुरू झालेला एकच गलका आणि कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे सरप यांच्या शेतातील घरामध्ये असणाऱ्या मंडळींच्या लक्षात आगीचा प्रकार आला. तेंव्हा शिवाजीराव सरप यांच्या कन्या अरुणा यांनी तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण केले. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाने बऱ्याच प्रयत्नाने आग आटोक्यात आणली. शेताला लागलेली आग विझविण्यासाठी पाण्याचे दोन बंब लागल्याचे समजते.

 belgaum

दरम्यान, यापूर्वी तीन-चार वेळा सरप यांच्या शेताला अशाप्रकारे आग लागण्याचे प्रकार घडले आहेत. तेंव्हा कोणी जाणून-बुजून तर ही आग लावत नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. तसेच याकडे पोलीस खात्यासह हिंडलगा ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. कांहीच्या मते रस्त्यावरून धूम्रपान करत ये-जा करणारे लोक बेजबाबदारपणे सिगारेट -बिडीची जळती थोटकं रस्त्याकडेला फेकतात त्यामुळे हे आगीचे प्रकार घडत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.