belgaum

टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघाच्या के. बी. कुलकर्णी कला दालनांमध्ये सलग पाच दिवस भरलेल्या प्राचार्य जे. बी. फडके यांच्या चित्र प्रदर्शनाचा सांगता समारंभ सोमवारी सायंकाळी पार पडला.

bg

सदर समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वरेरकर नाट्य संघाचे कार्यवाह जगदीश कुंटे, चित्रकार भरत जगताप व शिवाजी बेकवाडकर उपस्थित होते. यावेळी बोलताना जगदीश कुंटे म्हणाले की, प्राचार्य फडके यांच्या या प्रदर्शनाला कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

हे पाहून फडके यांच्या या चित्रकृती प्रदर्शनामधून नवोदित चित्रकारांना स्फूर्ती मिळावी आणि अशी अधिकाधिक प्रदर्शने भरावीत, अशी आमची इच्छा आहे. कोरोना काळाचा सदुपयोग कसा करता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्राचार्य जे. बी. फडके सरांचे हे काम आहे. जवळपास वर्षभर आपल्या सर्वांचे घराबाहेरील उपक्रम थंडावले होते.Fadake

त्या काळात प्रत्येकाने आपापले छंद जोपासले असतील. कोणताही कलाकार स्वस्थ बसू शकत नाही, त्याप्रमाणे फडके सरांनी आपल्या या वेळेचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला. त्यामुळे तुम्हा आम्हाला त्यांची ही चित्रकला पाहण्याची संधी मिळाली असे सांगून नव्या कलाकारांनी अशा तऱ्हेने अधिकाधिक प्रदर्शने येथे भरवावीत. आमचे त्यांना संपूर्ण सहकार्य राहील, असे आवाहन जगदीश कुंटे यांनी केले.

कोरोना काळातील मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून जवळ जवळ शंभर पेंटिंग्स तयार केली. ती रसिकांसमोर मांडण्याची संधी के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीने मला दिली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे असे प्राचार्य ज्योतिराज भिमराव उर्फ जे. बी. फडके यावेळी बोलताना म्हणाले. कार्यक्रमास सौ व श्री मेजर सदानंद शेळके, रमेश रायजादे, सुचेता रायजादे आदी निमंत्रित पाहुण्यांसह चित्ररसीक आणि विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. शोभा फडके यांनी सर्वांचे आभार मानले.

yash

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.