Monday, July 15, 2024

/

महिला दिनानिमित्त “आविष्कार” ने केले यशस्वी महिलांना बोलते

 belgaum

आव्हानांवर मात करण्याची क्षमता महिलांमध्ये उपजतच असते. त्यामुळे अडथळ्यांवर मात करत स्वतःमध्ये आणि परिस्थितीमध्ये बदल घडवत त्या यशस्वी होतात. अशा यशस्वी महिलांना अविष्कार या संस्थेने महिला दिनानिमित्त सत्कार करून त्यांना बोलते केले.

टिळकवाडी तील वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहात झालेल्या सदर कार्यक्रमात चिकोडी येथील पंख संस्थेच्या संचालिका गौरी मांजरेकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी पंखाची सुरुवात कशी झाली हे सांगून मी जरी संगणक विषयात पदवी घेतली तरी आज महिलांसाठी काम करते.

मात्र माझ्या शिक्षणाचा या कामातही उपयोग झाला, असे त्यांनी सांगितले. पंखांमध्ये विविध हस्त कलाकृती निर्माण करून त्याच्या विक्रीतून लहान मुलांना शैक्षणिक साहित्य दिले जाते व कांही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जाते अशी माहितीही त्यांनी दिली.

याप्रसंगी निहारिका पुसाळकर यांनी लक्ष्मी जिगजीनी व संध्या पाटील यांची मुलाखत घेतली. लक्ष्मी यांनी हेल्दी पांडा हा पौष्टिक अन्नपदार्थ निर्मितीचा व्यवसाय सुरू केला आहे. आपण कंपनीत काम करत होतो. मात्र प्रसूती रजेनंतर नोकरी सुरू झाल्यानंतर बाळाला सांभाळून काम करणे जमत नाही म्हणून कंपनीने कमी केले. त्यावेळी आता नोकरी न मागता स्वतःचा व्यवसाय सुरू करायचे ठरविले आणि हेल्दी पांडा सुरू केले. विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचे पौष्टिक गुण सुद्धा आपण पॅकिंगवर लिहित असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद लाभतो आहे, असे त्या म्हणाल्या.Avishkar womens day

संध्या पाटील यांनी आपले वजन खूप होते. जिमच्या माध्यमातून ते कमी केले व स्वतःचे जीम सुरू केले. या क्षेत्रात पुरुष असून मी तेथे महिला म्हणून पाय रोवणे कठीण होते. परंतु आव्हान पेलले लॉक डाऊनमध्ये ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केले. जिममध्ये जात असाल तरी घरच्या अन्नपदार्थांवर भर द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

प्रारंभी सुनीता व संध्या पाटणकर यांनी ईशस्तवन व उद्योग गीत सादर केले. आविष्कार संस्थेच्या अध्यक्षा सुलभा खानोलकर यांनी वक्त्यांचा सत्कार केला. अपर्णा सामंत यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. येत्या एप्रिल महिन्यापासून दर गुरुवारी दुपारी 4 ते 6 या वेळेत आविष्कारच्या सभासद नोंदणीला सुरुवात होणार आहे याची नोंद घ्यावी, असे आवाहन अध्यक्षा सुलभा खानोलकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.