युवकाची सैन्य दलात निवड झाली खरी पण प्रत्यक्षात भर्ती होऊन सेवा बजावण्याचे स्वप्न अपुरे राहिले कारण त्या युवकाचा सेवेत रुजू होण्याच्या काही दिवसांपुर्वीचं अपघाती मृत्यू झाला आहे.
सदर दुर्दैवी घटना बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात घडली आहे. निलेश बाळकृष्ण शिंदे वय 19 रा. झाडनावगे असे या अपघातात मयत झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.
कारलग्याहुन खानापूर कडे येत असताना लाल वाडी जवळील एका पुलावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात लष्करात भर्ती झालेला युवक निलेश हा ठार झाला आहे.रविवारी हा अपघात घडला होता.
शनिवारी निलेश याने आपला वाढदिवस साजरा केला होता रविवारी तो दुचाकीवरून जात असतेवेळी अपघात झाला या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर वेळेत उपचार झाले नाहीत बराच वेळ तो घटनास्थळी पडून होता त्या नंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्या नंतर उपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये देखील त्याला हलवले होते उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
निलेशचे वडील सेवा निवृत्त जवान आहेत मोठा भाऊ सैन्य दलात सेवा बजावत आहे तर निलेशची निवड सैन्य दलात झाली होती आगामी काही दिवसांवर तो रुजू होणार होता मात्र काळाने घाला घातला अन या अपघातात त्याचा बळी गेला.या घटनेने खानापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.