Friday, April 26, 2024

/

सामाजिक कार्यकर्त्याने बजावली वाहतूक पोलिसांची भूमिका!

 belgaum

वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्ताप होत असल्याचे पाहून एका सामाजिक कार्यकर्त्याने रहदारी पोलिसाच्या भूमिकेत शिरून वाहतूक नियंत्रित केल्याची घटना सकाळी गोवावेस श्री बसवेश्वर चौक येथे घडली.

प्रसाद चौगुले असे या सामाजिक कार्यकर्त्याचे नांव आहे. प्रसाद हा सकाळी गोवावेस श्री बसवेश्वर सर्कल येथून आपल्या दुचाकीवरून जात असताना त्याला चौकात वाहतुकीची कोंडी झाल्याचे निदर्शनास आले.Traffic police

सकाळची वेळ असल्याने बसवेश्वर चौक येथील रहदारी पोलीस अद्याप आपल्या कामावर रुजू झाला नव्हता. त्यामुळे वाहतुकीची होत असलेली कोंडी सोडविण्यास कोणीच नसल्याचे पाहून प्रसाद चौगुले याने चौकात मध्यभागी थांबून वाहतूक नियंत्रण करण्यास सुरुवात केली.

 belgaum

रहदारी पोलिसाच्या भूमिकेतील प्रसादने आपले काम चोख बजावल्यामुळे अल्पावधीत गोवावेस येथील वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, चौकात ड्युटीवर हजर राहण्यासाठी आलेल्या रहदारी पोलिसाने प्रसाद चौगुले याने प्रसंगावधान राखून केलेल्या कार्याची प्रशंसा करून त्याला धन्यवाद दिले. त्याचप्रमाणे चौकातून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्येही प्रशंसोद्गार काढले जात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.