Friday, April 26, 2024

/

कलामहर्षी के. बी. कुलकर्णी जयंती 4 फेब्रु.ला होणार साजरी

 belgaum

वरेरकर नाट्य संघ आणि के. बी. कुलकर्णी कलादालन यांच्यावतीने श्रेष्ठ चित्रकार केबी कुलकर्णी यांची जयंती येत्या गुरुवार दि. 4 फेब्रुवारी 2021 रोजी साजरी केली जाणार आहे.

टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहामध्ये कोल्हापूरचे ज्येष्ठ चित्रकार व सिनेदिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास व्याख्याते म्हणून कणकवली येथील जेष्ठ चित्रकार व शिल्पकार नामानंद मोडक उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमानिमित्त भरविल्या जाणाऱ्या “के. बी. परंपरा” या चित्रकृती प्रदर्शनाचे उद्घाटन वरेरकर नाट्य संघाचे अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या हस्ते सकाळी 10:30 वाजता होणार आहे.

सदर प्रदर्शनात खुद्द के. बी. कुलकर्णी रवी परांजपे, जॉन फर्नांडिस, मारुती पाटील, विकास पाटणेकर, संतोष पेडणेकर, किरण हणमशेठ आणि सुजाता बेळवी अशा के. बी. कुलकर्णी सरांच्या शिष्यांच्या चित्रांचा समावेश असेल.

 belgaum

सदर प्रदर्शन 4 फेब्रुवारी पासून 8 फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. गेल्या वर्षी के. बी. कुलकर्णी जन्मशताब्दी सोहळ्यात ललित कला अकादमी नवी दिल्लीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी बेळगावातील कांही नवोदित चित्रकारांना जाहीर केलेल्या पारितोषिकांचे वितरण याच कार्यक्रमात होणार आहे.

सदर कार्यक्रम रसिकांना विनामूल्य खुले आहेत. बेळगावात भरणाऱ्या या प्रदर्शनाचा आणि सर्व कार्यक्रमांचा लाभ रसिकांनी कोविडची नियमावली पाळून घ्यावा, असे आवाहन सचिव जगदीश कुंटे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.