Sunday, July 21, 2024

/

इंडिगोच्या बेळगाव -चेन्नई थेट विमान सेवेला प्रारंभ!

 belgaum

चेन्नई -बेळगाव -चेन्नई सेक्टरमध्ये इंडिगो कंपनीने आपल्या बेळगाव -चेन्नई या नव्या मार्गावरील विमान सेवेचा आज गुरुवारपासून शुभारंभ केला आहे.

इंडिगो कंपनीने बेळगाव विमानतळाच्या सहकार्याने आज सकाळी विमानतळावर बेळगाव -चेन्नई या आपल्या नव्या विमान सेवेच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी फीत कापून दिपप्रज्वलन करण्याद्वारे विमान सेवेचा शुभारंभ केला. याप्रसंगी एटीएम राजेश विजयकुमार, एजीएम (सीएनएस) पी. एस. देसाई, टर्मिनल मॅनेजर बी. जी. रेड्डी, केएसआयएसएफ सेक्युरिटी हेड इराप्पा वाली, इंडिगोचे स्टेशन मॅनेजर आणि इतर विमान कंपन्यांचे स्टेशन मॅनेजर तसेच प्रवासी उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर मौर्य आणि चेन्नईला जाणारा पहिला प्रवासी या उभयतांनी केक कापला.

यावेळी संचालक राजेशकुमार मौर्य यांनी चेन्नई सेक्टरमध्ये विमान सेवा सुरू केल्याबद्दल इंडिगोचे स्टेशन मॅनेजर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी सेक्युरिटी हेड वाली यांच्यासमवेत चेन्नईला प्रवास करणाऱ्या पहिल्या प्रवाशाकडे बोर्डिंग पास सुपूर्द केला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

हवाईमार्गे बेळगावला जोडणे जाणारे चेन्नई हे 11वे शहर असून इंडिगोसाठी बेळगाव येथून तिसरे शहर आहे. आता इंडिगो, अलाईन्स एअर, स्टार एअर, स्पाइस जेट आणि ट्रू जेट अशा एकूण पाच विमान कंपन्यांच्या हवाई सेवेद्वारे बेंगलोर, हैदराबाद, म्हैसूर, कडप्पा, तिरुपती, सुरत, अहमदाबाद, इंदोर, मुंबई, पुणे व चेन्नई बेळगावशी जोडले गेले आहेत.Indigo

दरम्यान, बेळगाव विमानतळावर आज सकाळी 10:25 वाजता आगमन होऊन 10:55 वाजता चेन्नईला रवाना झालेल्या इंडिगोच्या 6ई -7131/7132 या विमानाला विमानतळाच्या अग्निशामक दलातर्फे “वॉटर सॅल्युट” देण्यात आला.

बेळगाव -चेन्नई दरम्यान आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी इंडिगो विमान सेवा उपलब्ध असेल. सदर 78 आसनी विमानाद्वारे 29 प्रवाशांचे आगमन आणि 31 प्रवाशांचे प्रस्थान होईल. ही संख्या कांही दिवसांनी वाढविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.