Thursday, April 25, 2024

/

एक्सेस इलाईट हुबळीने हस्तगत केला बीपीसी चषक!

 belgaum

आनंद अकादमी ड्रॉपइन वॉरियर्स संघाला 26 धावा नमवून बलाढ्य एक्सेस इलाईट हुबळी संघाने बोर्ड ऑफ पेरेंट्स फॉर क्रिकेट इन बेलगाम आयोजित आणि दीपक नार्वेकर पुरस्कृत बीपीसी चषक 14 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर सदर स्पर्धा आज शुक्रवारी यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एक्सेस इलाईट हुबळी संघाने मर्यादित 25 षटकांत 8 बाद 121 धावा झळकवल्या. प्रत्युत्तरादाखल आनंद अकादमी ड्रॉपइन वॉरियर्स संघाचा डाव 23.5 षटकात सर्वगडी बाद 95 धावा असा संपुष्टात आला.

या पद्धतीने अंतिम सामन्यात 26 धावांनी विजयी झालेल्या एक्सेस इलाईट संघातर्फे सात्विक सामंत (40 चेंडूत 47 धावा), मनिकांत बुकिटगार (17 चेंडूत 25 धावा) व वृषभ पाटील (16 चेंडूत 24 धावा) यांनी तडाखेबंद फलंदाजी केली. त्याचप्रमाणे साहिल सूर्यवंशी (3 गडी), मनिकांत बुकिटगार (2 गडी), अभय कुलकर्णी (2 गडी) आणि वेदांग बिडकर (1 गडी) यांनी यशस्वी गोलंदाजी केली. अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार एक्सेस इलाईटच्या मनिकांत बुकीटगार याने पटकाविला.Bpc

 belgaum

अंतिम सामन्यानंतर आयोजित बक्षीस समारंभात प्रमुख पाहुणे माजी रणजीपटू सोमशेखर शिरगुप्पी, दीपक नार्वेकर, विरुपक्षी संबागी, मनीष ठक्कर, मल्लिकार्जुन जगजंपी व प्रकाश पाटील यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी विजेत्या आणि उपविजेत्या संघांना आकर्षक चषक आणि रोख रक्कम बक्षिसादाखल देण्यात आली. वैयक्तिक पारितोषिक विजेते पुढीलप्रमाणे आहेत. अंतिम सामना सामनावीर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक -मनिकांत बुकिटगार (एक्सेस इलाईट हुबळी), उत्कृष्ट फलंदाज -सिद्धेश असलकर (गोकाक ग्लॅडिएटर्स), उत्कृष्ट गोलंदाज -साईनाथ राजोळी (एक्सेस इलाईट), उत्कृष्ट यष्टिरक्षक -अनमोल पागड (गोकाक ग्लॅडिएटर), मालिकावीर पियुष गेहलोत.

सदर स्पर्धेसाठी समालोचक म्हणून प्रमोद जपे, अरिफ बाळेकुंद्री आणि अनिल कुडतरकर यांनी काम पाहिले. शिवानंद पाटील याने स्कोररची तसेच अनिल गवी व ज्योती पाटील यांनी ग्राउंडस्मनची भूमिका चोखपणे पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.