Monday, May 6, 2024

/

बेळगाव जिल्ह्यातील आमदारांच्या कार्यालयात चोरी!

 belgaum

भाजपचे आमदार महादेवाप्पा यादवाड यांच्या कार्यालयाला टार्गेट करत चोरांनी आज डल्ला मारला आहे. ही चोरीची घटना शनिवारी रात्री रामदुर्ग शहरात घडली आहे.

रामदुर्ग येथील भाजपचे आमदार महादेवाप्पा यादवाड यांचे कार्यालय रामदुर्ग शहरात आहे. या कार्यालयाला चोरट्यांनी लक्ष्य केले असून दरवाज्याचे कुलूप तोडून कागदपत्रांची नासधूस केली आहे.

आमदारांच्या कार्यालयात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात ही सर्व घटना कैद झाली असून चोरट्यांनी संपूर्ण चेहरा झाकून घेतला आहे. त्यामुळे सादर प्रकरणातील आरोपींबाबत माहिती उपलब्ध झाली नाही.

 belgaum

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून या चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत असून हे प्रकरण रामदुर्ग पोलीस स्थानकात दाखल करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.