Saturday, May 4, 2024

/

श्रीराम सेना हिंदुस्थान तर्फे भव्य गडकोट स्पर्धा

 belgaum

श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने बेळगाव मर्यादित भव्य गडकोट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव उत्तर विभाग आणि दक्षिण विभाग अशा दोन विभागात हि स्पर्धा होणार असून बेळगाव उत्तर विभागात ७ बक्षिसे तसेच दक्षिण विभागात ७ बक्षिसे जाहीर करण्यात आली असून प्रथम क्रमांकाच्या गडकोट प्रातिकृतीसाठी २१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणीची अखेरची तारीख १० डिसेंबर २०२० हि आहे, याची दाखल साधकांनी घ्यावी. या स्पर्धेत नाव नोंदणी करण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी हॉटेल राजहंस, खानापूर रोड, (गोगटे पेट्रोलपंपच्या बाजूला), बेळगाव याठिकाणी संपर्क साधावा. तसेच उत्तर विभागातील स्पर्धकांनी बळवंत शिंदोळकर मो. ९७४२४२१३४३, संदीप चौगुले मो. ९७४२०२०४८२, आणि दक्षिण विभागातील स्पर्धकांनी श्रीकांत कुर्याळकर मो. ९९७२५२३९२९, विजय पाटील मो. ९७३९०४२८९४, राजेंद्र बेलूर ९०३६५०५४९० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुस्कर यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.