Monday, April 29, 2024

/

… आणि तिचा दफन केलेला मृतदेह सापडला कणकुंबी जंगलात

 belgaum

हारुगेरी (ता. रायबाग) येथून चार महिन्यापूर्वी बेपत्ता झालेला एका अल्पवयीन युवतीचा मृतदेह कणकुंबीनजीक जंगलात दफन केलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या पद्धतीने पुन्हा कणकुंबीजवळ घातपाताची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, हारुगेरी येथील एक 17 वर्षीय युवती चार महिन्यापासून बेपत्ता होती. याबाबत हरुगिरी पोलिस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली होती. प्रारंभापासूनच संबंधित युवतीचा खून झाला असावा असा संशय व्यक्त केला जात होता.

आता काल मंगळवारी रायबाग पोलिसांनी कणकुंबी नजीकच्या जंगलात दफन केलेल्या त्या मुलीचा सांगाडा हस्तगत केला.

 belgaum

प्रांताधिकारी अशोक तेली यांच्या उपस्थितीत तो सांगाडा उकरून काढण्यात येऊन पंचनामा करण्यात आला. हारुगेरी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून घातपाताच्या सदर घटनेमुळे कणकुंबी परिसर पुन्हा एकदा हादरून गेला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.