Tuesday, April 30, 2024

/

शहरात हस्तिदंत आणि वाघनखे विक्री करणारा गजाआड

 belgaum

बेळगांव शहरात अवैधरित्या हस्तिदंताची आणि वाघ नखांची विक्री करणाऱ्या एका इसमाला वनविभागाच्या पथकाने कारवाई करून अटक केली आहे.

श्रीराम अर्जुनसा बाकळे (वय 46, खडेबाजार शहापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. बेकायदेशीररित्या वाघ नखे आणि हस्तिदंत यांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळताच बेळगांव वनविभागाच्या पीएसआय रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करून श्रीराम बाकळे याला काकेरू चौक खडेबाजार शहापूर येथे वाघ नखे आणि हस्तिदंतापासून बनवलेल्या अंगठ्याची विक्री करताना रंगेहात पकडून अटक करण्यात आली.

तसेच त्याच्याकडील हस्तिदंतापासून बनवलेल्या दोन अंगठ्या त्या आणि पांच वाघ नखे जप्त करण्यात आली. आरोपीवर बेळगांव येथील तृतीय जेएमएफसी न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 belgaum

बेळगांव वनविभागाचे अधिकारी या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.