Friday, December 20, 2024

/

कडोलीत झाली घरफोडी

 belgaum

कडोली (ता. बेळगांव) येथील एका घरात घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

कडोली येथील सुनील बाळेकुंद्री यांच्या या घरात हा चोरीचा प्रकार घडला. चोरट्यांनी काल सोमवारी रात्री जाधव यांच्या घरात घुसून घरातील 60 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. यामध्ये 40 हजार रुपयांच्या रोख रकमेत आता आणि 20 हजार रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.

किंमती ऐवज शोधण्यासाठी चोरट्यांनी घरातील सामान विस्कटून टाकले होते. याप्रकरणी काकती पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान अलीकडच्या काळात बेळगांव ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तेंव्हा पोलिस खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रात्रीची पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.