Sunday, May 5, 2024

/

बाईक आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात; एकाचा मृत्यू

 belgaum

दैनंदिन कामासाठी राष्ट्रीय महामार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या दुचाकीस्वाराला मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिल्यामुळे मोठा अपघात घडला.

या धडकेत युवकाला गंभीर दुखापत झाली असून उपचारादरम्यान या युवकाचा मृत्यू झाला आहे. हि घटना ३ नोव्हेंबर रोजी सकाळी बेळगाव तालुक्यातील भूतरामहट्टी गावातील मुक्तिमठजवळ घडली आहे.

हुक्केरी तालुक्यातील बेनकोळ्ळी गावातील अर्जुन यल्लाप्पा गस्ती, वय २४, असे मृत युवकाचे नाव आहे. अर्जुन हा बेळगावमधील हिंडाल्को कंपनीमध्ये कामाला होता.

 belgaum

मुक्तिमठ जवळ येथे झालेल्या अपघातात अर्जुन गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात करण्यात आली असून घटनास्थळी काकती पीआय राघवेंद्र हळळूर, पीएसआय अविनाश यरगोप्प, आर. टी. लक्कनगौडर यांनी भेट देऊन पंचनामा केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.