Friday, May 3, 2024

/

अज्ञातांनी गंजी पेटवून दिल्याने 40 पोती बासमती भात भस्मसात

 belgaum

बेळगांव सुवर्ण विधानसौध परिसरातील एका शेतामध्ये रचून ठेवलेल्या भाताच्या गंजीला अज्ञातांनी आग लावल्यामुळे सुमारे 40 पोती भात जळून भस्मसात झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

शिंदोळी गावातील चंद्रगौडा बाबागौडा पाटील यांच्या मालकीच्या शेतामध्ये सदर घटना घडली. अज्ञातांनी काल रात्री गंजी पेटवून दिल्यामुळे सुमारे 40 पोती बासमती भात जळून भस्मसात होऊन पाटील यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

भात कापणी नुकतीच पूर्ण झाल्यामुळे पाटील यांच्या शेतात भाताची गंजी रचून ठेवण्यात आली होती.

 belgaum

भाताच्या गंजीला आग लावण्यात आल्याचा प्रकार आज सकाळी शेतीचे काम करण्यासाठी आलेल्या आसपासच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ सदर घटनेची माहिती चंद्रगौडा पाटील यांना दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.