Thursday, April 25, 2024

/

गूळ आणि वस्तुस्थिती

 belgaum

गूळ ही सर्वसामान्य कुटुंबाच्या रोजच्या वापरातील वस्तू आहे.पूर्वी सगळ्या गोड पदार्थात गुळाचाच वापर केला जायचा.पण इंग्रजांनी भारतात साखर कारखाना सुरू केला आणि गुळाला दुय्यम स्थान मिळाले.

पूर्वी सरसकट सगळे गुळाचाच चहा प्यायचे.पण साखर मिळू लागल्यावर गुळाचा चहा पिणे कमीपणाचे मानले जावू लागले.आता कोरोनाचे संकट आल्यावर सगळीकडे रोग प्रतिकारक शक्तीची चर्चा होऊ लागली आहे.एका संशोधनानुसार साखरेचे पदार्थ खाल्ल्यास पन्नास टक्के मनुष्याच्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती कमी होते.

सध्या आधुनिक जगात बरेचसे रोग हे साखरेच्या सेवनामुळे होत आहेत असे दिसून आले आहे.त्यामुळे जनतेचा कल आता गुळाकडे वळला आहे.गुळाचा वापर आता बहुतेक जण करू लागले आहेत.पण बाजारात सध्या पिवळ्या धम्मक रंगाचे गूळ उपलब्ध आहे त्याचे गुणधर्म पूर्वीच्या गुळासारखे आहेत काय याचा विचार करायला पाहिजे.Gul jaggery

 belgaum

पिवळ्या रंगाचा गूळ म्हणजे फार चांगला असे मानले जाते पण वस्तुस्थिती तशी नाही आहे.गुळाला रंग येण्यासाठी त्यामध्ये रंगाचा वापर केला जातो.आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे गुळाच्या तुलनेत साखरेचा दर कमी असल्याने गुळाच्या निर्मितीत साखरेचा वापर मोठ्या प्रमाणावर गूळ उत्पादक करत आहेत.बाजारात उपलब्ध असणाऱ्या ऑरगॅनिक गुळाचा रंग पिवळा नसतो पण त्याची चव मात्र उत्तम असते.

सध्या दिखाव्याचा जमाना आहे त्यामुळे जेवढा गूळ पिवळ्या रंगाचा तेव्हढा चांगला अशीच जनतेची समजूत आहे.पण गूळ तयार करणारे गूळ तयार करताना त्यात मोठ्या प्रमाणावर साखरेचा वापर करतात हे जनतेने समजून घेतले पाहिजे.पिवळ्या धम्मक रंगाचा गूळ खाऊन आपले आरोग्य बिघडवून घ्यायचे की ऑरगॅनिक गूळ खाऊन आपले आरोग्य चांगले ठेवायचे याचा विचार जनतेने करायला हवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.