Monday, May 6, 2024

/

अनगोळचे दोघे दुचाकी चोरटे अटकेत…

 belgaum

मारिहाळ पोलिसांनी दोघा अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक करून त्यांच्या जवळील लाखो रुपयांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.

वैभव महादेव शेळके वय 21 व रियान इम्तियाज शेख वय 21 दोघेही रहाणार झटपट कॉलनी अनगोळ अशी या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत.

मारिहाळ पोलीस निरीक्षक बी एस मंटूर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.मूतगा येथील श्रीराम कॉलनी येथील रहिवाशी बसवराज हडपड यांच्या घरातून चोरी झालेल्या दुचाकींचा तपास करताना या चोरट्याना अटक करण्यात आली आहे.

 belgaum

दोन्ही चोरट्या कडून सोन्याचे दागिने,सहा दुचाकी,लॅपटॉप,टी व्ही,मोबाईल,सिलेंडर असे सामान जप्त केले असून त्याची किंमत 3 लाख 71 हजार रुपये इतकी आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.