Monday, May 20, 2024

/

रहदारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

 belgaum

बेळगाव शहरात यापुढे वाहतुकीची कोणतीही समस्या होऊ नये यासाठी रहदारी पोलीस विभागाने काटेकोर नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. रहदारीचे नियम मोडणार्यांवर यापुढे कठोर कारवाई करण्याचा इशारा रहदारी पोलीस विभागाने दिला आहे. आज शहर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लन्घन होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

आज रहदारी पोलीस विभागाच्या वतीने वाहतुकीबाबत सतर्कता दाखविण्यात आली आहे. शहरात अनेक ठिकाणी पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली आहे. सोमवारी कॅम्प पोलीस स्थानकाचे सीपीआय डी. संतोषकुमार यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला.

त्यासोबतच उल्लंघन करणाऱ्यांकडून तात्काळ दंडही वसूल करण्यात येत होता. यापुढील काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासहीत वाहतुकीणीच्या नियमांचे उल्लंघन होता काम नये, यासाठी पोलीस विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. रहदारी पोलिसां व्यतिरिक्त सिव्हिल पोलीस देखील हेल्मेटसक्ती कारवाई करत आहेतPolice penalty

 belgaum

दक्षिण विभागाच्या रहदारी पोलिसांनी नुकतेच एका तरुणाला हेल्मेटसक्तीसाठी कारवाई केली होती. या दरम्यान कायदा हातात घेऊन, त्या तरुणाला मारहाण करण्यात आली होती. या प्रकारचा संपूर्ण बेळगावमधून निषेध नोंदविला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनही देण्यात आले होते.

हि घटना ताजी असतानाच रहदारी पोलिसांनी नियम, अटी आणि कायदा पाळण्यासाठी तीव्र कारवाई करण्यास सुरु केली आहे. वाहतुकीचे नियम हे जनतेच्याच सुरक्षिततेसाठी आहेत. परंतु सध्या जनता वेगळ्याच मानसिकतेत वावरत आहे. दंडात्मक कारवाई बडगा उगारण्यात येत असल्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पोलीस आणि जनता यामध्ये खटके उडण्याची चिन्हे दिसत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.