Friday, April 26, 2024

/

‘या ग्रामीण भागातील रस्त्याची करा दुरुस्ती’

 belgaum

एकीकडे बेळगाव ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण होत असताना शहराजवळील भवानी नगर ते मंडोळी रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे खुपच दुरावस्था झाली आहे . त्यामुळे या भागातून रस्त्यावरुन ये जा करणाऱ्याना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

यावर्षी झालेल्या पावसाने अगोदरच ग्रामीण भागांत रस्ते खराब झाले आहेत अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.सध्या स्थितीत भवानीनगर ते मंडोळी रोडची खूपच दुरावस्था झाली आहे या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे .

या रस्त्यांवरुन  पादचारी वाहन धारकांना जाणेदेखील मुश्किल बनले आहे . खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने  वाहनधारकांना या रस्त्यावरुन जाताना मोठी कसरत करावी लागत आहे .

 belgaum

या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार नागरिक करीत आहेत . या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे इथले नागरिक त्रासून गेले आहेत .  लवकरात लवकर या रस्त्याच्या दुरुस्तीचे  कामकाज हाती घेण्याचे मागणी इथले नागरिक करीत आहेत .

या रस्त्यावरील खड्ड्यात अनेक वाहन अडकून पडत आहेत अश्या वेळी रस्त्याची डागडुजी केली जावी अशी मागणी केली जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.