Thursday, April 25, 2024

/

रोवण्यात आलेले “ते” दगड शेतकऱ्यांनी टाकले उखडून

 belgaum

हलगा-मच्छे बायपासबाबतीत हालचाली गतिमान झाल्याचे वृत्त काल झळकले. मात्र ही बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास येताच आज या भागातील शेतकरी पेटून उठले आहेत. शिवाय हे कामकाज सुरु करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलाच धडा शिकविण्याचे ठाम मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

शुक्रवारी वडगाव ते अवचारहट्टी या मार्गावर एल अँड टी या कंपनीने दगड रोवले आहेत. परंतु याबाबत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना देण्यात आली नाही. दिवसभर शेतातील कामे उरकल्यानंतर महिलावर्ग घरी परतला. आणि सायंकाळी सातच्या नंतर हे दगड येथे रोवण्यात आले असल्याची बाब आज उघडकीस आली आहे. यामुळे येथील शेतकरी तीव्र संतापले असून हे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता चांगलीच अद्दल घडविली जाईल, असे ठाम मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. शिवाय रोवण्यात आलेले दगड शेतकऱ्यांनी उपटून टाकले आहेत.

आज सकाळी या भागातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन झालेल्या प्रकारचा निषेध नोंदविला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शोभा बिर्जे या शेतकरी महिलेने सांगितले कि, आम्ही काळ सायंकाळी 7 वाजेपर्यंत शेतातील कामे करत होतो. परंतु येथे हे दगड रोवण्याचा काम आम्ही घरी परतल्यानंतर करण्यात आले आहे. याबाबत आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नसून रात्रीच्या अंधारात हे कृत्य करण्यात आले आहे. नोकरी, व्यवसाय हे सर्व ठप्प झाले असून आता केवळ या शेतजमिनीवरच आमचा उदरनिर्वाह चालतो. आता ही शेतजमीनही बळकावण्याचा सरकारचा घाट असून आम्ही कसे जगायचे? असा प्रश्न या शेतकरी महिलेने उपस्थित केला.Vadgaon board removed

 belgaum

बेळगाव जिल्हा रयत संघटनेचे उपाध्यक्ष राजू मरवे यांनी या प्रकाराबाबत आक्रोश व्यक्त केला असून हे काम करणाऱ्याला आम्ही चांगलाच धडा शिकवू असा पवित्रा त्यांनी घेतला. भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची जीडीपी २४ टक्क्यांवर आली आहे परंतु कृषी क्षेत्राची जीडीपी ही अजूनही 4 टक्क्यांवर आहे. त्यामुळे शेतकरी जगला तरच देश जगेल, आणि टिकेल. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांना आम्ही प्रत्त्युत्तर देण्यास समर्थ आहोत. शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली खड्ड्यांची सिटी उभारण्यात येत आहे. जनतेची दिशाभूल करून भ्रष्टाचार करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, असे कठोर मत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.पिकाऊ जमीन बळकावण्याचे स्वप्न धुळीस मिळवू, आणि ही जमीन कशी वाचवायची यासाठी आम्ही एकसंघ राहून लढा देऊ, ही जमीन बेकायदेशीररित्या बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वेळीच ठेचू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

धामणे रोड, येळ्ळूर रोड, यर्माल रोड येथे अचानकपणे मोजमाप करून हे दगड रोवण्यात आले आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांशी बातचीत केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. आणि कोणालाही विश्वासात न घेता,हे कामकाज हाती घेण्यात आले आहे. हे कामकाज बेकायदेशीर आहे, आणि याबद्दल शेतकऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे, असे मत विलास घाडी यांनी व्यक्त केले.

या बायपास संदर्भातील खटला न्यायप्रविष्ट असून न्यायालयाने २००९ चे नोटिफिकेशन न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा मार्ग दुसऱ्या ठिकाणी नियोजित असून याठिकाणी अचानकपणे आणि बेकायदेशीरपणे महामार्ग प्राधिकरणाकडून याचे कामकाज करण्याचा घाट सुरु आहे. शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनीतून हा बायपास करून नेमके काय साध्य करायचे आहे, याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. हे कामकाज शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन करण्यात आले तर मात्र शेतकरी पेटून उठतील आणि मोठ्या आंदोलनाचा पवित्रा घेतील, यात तिळमात्र शंका नाही.

वडगावतील शेतकरी पुन्हा आक्रमक-महिला शेतकरी बनल्या रणरागिनी-शेतात मार्किंग साठी बसवलेले खोदून काढले फलक-शुक्रवारी एल अँड टी कंपनीने बसवले होते दगड-शनिवारी शेतकऱ्यांनी आंदोलन करून काढले

#belgaumfarmers
#halgamachhebypass
#markingboardremoved

वडगावतील शेतकरी पुन्हा आक्रमक-महिला शेतकरी बनल्या रणरागिनी-शेतात मार्किंग साठी बसवलेले खोदून काढले फलक-शुक्रवारी एल अँड…

Belgaum Live ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 12, 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.