शांताई वृद्धाश्रमाजवळच्या रस्त्याचे खड्डे दुरुस्त’

0
 belgaum

मंडोळी मेन रोड पासून शांताई वृद्धाश्रमापर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. याठिकाणी अन्नभाग्य योजनेतून पुरवठा करण्यात येणाऱ्या धान्याचे गोडाऊन आहे. सदर रस्त्यावर अन्नभाग्य गोडाऊनच्या माध्यमातून मोठी वाहने ये-जा करतात. या वाहनांमुळे येथील रस्त्याची चाळण उडाली होती. खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले होते.

बामनवाडी रस्त्यापासून जवळच असलेल्या शांताई वृद्धाश्रमाला जाणारा रस्ता पूर्णपणे खचला होता.

bg

यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. कसरत करून या रस्त्यावरून ये – जा करावी लागत होती.

याची दखल घेत माजी महापौर विजय मोरे यांनी संबंधित गोडाऊन मालकाला याबाबद्दल माहिती दिली. यादरम्यान या रस्त्यावर येणाऱ्या जवळपास 100 वाहनांची अडवणूक करण्यात आली.

त्यानंतर गोडाऊन मालकाला बोलावून हे खड्डे बुजविण्यात आले. आणि त्यानंतर वाहनांना सोडण्यात आले.

विजय मोरे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याची डागडुजी करण्यात आल्याबद्दल परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत होते.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.