Friday, March 29, 2024

/

पिरनवाडी-मणगुत्ती प्रकरणी “सकल मराठा”चे पोलीस आयुक्तांना निवेदन

 belgaum

पिरनवाडी-मणगुत्ती येथील शिवमूर्ती प्रकरणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

मणगुत्ती येथे बसविण्यात आलेली शिवमूर्ती घाईगडबईत हटविण्यात आली. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने स्थानिक प्रशासन तसेच गावपातळीवर समन्वय साधून 15 दिवसांच्या आत पुन्हा मूर्ती स्थापन करण्याचे आश्वासन दिले.

परंतु अजूनही मूर्तीची स्थापना करण्यात आली नाही. याचे पडसाद शिवप्रेमीतून कर्नाटक तसेच महाराष्ट्रातही उमटत आहेत.

 belgaum

प्रशासनाच्यावतीने देण्यात आलेले आश्वासन हे पाळण्यात यावे आणि त्वरित शिवमूर्ती पुनर्स्थापित करावी अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.