ऑक्सिजन सिलिंडर पुरवठ्यासाठी सीमाभागातील मराठा संघटनांचा पुढाकार

0
 belgaum

मराठा समाज सुधारणा मंडळ, तुकाराम बँक, सकल मराठा क्रांती मोर्चा आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संपूर्ण जगासह देशभरात कोरोनाची दहशत सुरु आहे. कर्नाटकात सर्वात जास्त चाचण्या झालेल्या जिल्ह्यांमध्ये बेळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. बेळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उपचाराअभावी अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. तर काही रुग्णांच्या उपचारात दुर्लक्ष होत आहे.

bg

शिवाय ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता भासत आहे. अनेक वृत्तपत्रातून ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता असल्याचे वृत्त झळकत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून मराठा समाज सुधारणा मंडळ, तुकाराम बँक, सकल मराठा क्रांती मोर्चा आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने हा संकल्प करण्यात आला आहे.

ज्या रुग्णांना याची गरज भासेल त्यांनी वैद्यकीय अहवालासह तुकाराम बँकेत अर्ज करावा, असे आवाहन मराठा समाज सुधारणा मंडळ, तुकाराम बँक, सकल मराठा क्रांती मोर्चा आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने करण्यात आले आहे.

ऑक्सिजन सिलेंडरसाठी संपर्क करा
कॉन्टॅक्ट :-
तुकाराम बँक 0831-4215555 & 2421692.
प्रकाश मरगाळे 9448145198.
महेश जुवेकर 09901909333.
गणेश दड्डीकर 9844497079.
किशोर मराठे 8951992086.
विशाल गोंडाडकर 8951414561.
सुनील आनंदाचे 9448230656.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.