Friday, March 29, 2024

/

बेळगावच्या श्री ठाणेदार यांचा अमेरिकेत डंका

 belgaum

बेळगावसारख्या गावातून सातासमुद्रापारच्या अमेरिकेत गेलेला ‘ श्री ठाणेदार ’ नावाचा धडपड्या मराठी मुलगा अमेरिकेतील मिशिगन येथील राज्यपाल पदाची निवडणूक प्राथमिक फेरीत जिंकली आहे.

मिशिगनमध्ये राजकीय कुरघोड्या, पक्षपात आदी गैरप्रकार बोकाळले असून नागरिक त्यास कंटाळले आहेत. मिशिगनमधील सरकार हे ठरावीक लोकांसाठी काम करीत असून बहुसंख्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. हे बदलण्यासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी स्पष्टोक्ती श्री ठाणेदार यांनी गेल्या ३ वर्षांमागे केली होती.

डेट्रॉइट येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हा मनोदय जाहीर केला होता. ही निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीच्या प्राथमिक फेरीत ग्रेटचेन व्हाईटमर आणि अब्दुल अल-सय्यद यांच्यासोबतच्या लढतीत तिसऱ्या स्थानी आले आहेत.Shri thanedar

 belgaum

शहापूरच्या मीरापूर गल्लीतील गरीब कुटुंबात जन्मलेल्या श्री ठाणेदार ही सहा भावंडे. तशाच परिस्थितीत त्यांना शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्याचे महत्व पटले. दहावीत त्यांना ५५ टक्के गुण मिळाले.

नोकरी आणि शिक्षणाच्या प्रवासात त्यांनी अनेक आव्हाने पेलली आणि त्यानंतर त्यांनी दमदार भरारी घेतली. राजकारणात जातानाही आपल्या कंपनीचे समभाग विकून त्यांनी ५० कामगारांना १.५ मिलियन डॉलर्स इतका बोनस वाटला आहे.

त्यांनी अमेरिकेत मिळविलेल्या या यशाबद्दल बेळगावच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.