Friday, April 26, 2024

/

ऊन-पावसाचा खेळ!

 belgaum

गेल्या चार दिवसांपासून शहर परिसरातील वातावरणात बदल झाला असून दिवसभर कडक उन्हाचे चटके आणि सायंकाळी जोरदार पाऊस सुरु होत आहे.

मागील पंढरवाड्यापासून पावसाने काही काळ विश्रांती घेतली. गणेशोत्सवाच्या काळात पावसाच्या हलक्या सरी बरसत होत्या.

पण गेल्या चार दिवसांपासून सायंकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे शहर परिसरात पुन्हा रस्त्यावर पाणी साचल्याने दिसून आले.

 belgaum

अचानकपाने सुरु होणाऱ्या पावसाने नागरिकांची मात्र पुरतीच तारांबळ उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. जोरदार वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. आणि शहर तसेच परिसरातील अनेक सखल भागांमधून पाणी साचले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.