खानापूर येथील सार्वजनिक रुग्णालयामध्ये स्वॅब कलेक्शन विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आली असून खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते या खोलीचे उदघाटन करण्यात आले. याची निर्मिती सेल्को सोलार या कंपनीने केली आहे.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय नांद्रे यांनी सार्वजनिक रुग्णालयात रूग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांची माहिती दिली.
आरोग्य सेवेत नित्यनेमाने सेवा बजाविणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी कौतुक केले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे , डॉ. नारायण तसेच आरोग्य विभागाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.