अयोध्येतील राम मंदिराचा भूमी पूजनाचा मुहूर्त काढलेल्या बेळगावातील पंडितास जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बेळगाव येथील गोवा वेस स्थित विद्या विहार विद्यालयाचे कुलपती पंडित एन आर विजयेंद्र शर्मा यांनी राम मंदिर भूमी पूजनाचा मुहूर्त दिला होता त्यांना जीवे मारण्याची धमकी फोन आला आहे या संदर्भात टिळकवाडी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे .
देशाच्या विविध भागातुन त्यांना फोन करून राम मंदिराच्या भूमी पूजनाचा काढलेला मुहूर्त मागे घ्या अशी धमकी देण्यात आली आहे . गेल्या चार दिवसात पंडित शर्मा यांना देशाच्या विविध भागातून ५० हुन अधिक फोन कॉल्स आले आहेत व त्या फोन मधून राम मंदिराची भूमी पूजनाची मुहूर्त मागे घ्या अन्यथा तुम्हाला जीवे मारू असेहि धमकावण्यात आले आहे .
या संदर्भात बेळगाव पोलिसांनी शर्मा याना पोलीस संरक्षण दिले आहे .राष्ट्र संत स्वामीजी गोविंद गिरी महाराज यांनी अयोध्येतून संपर्क साधून शर्मा यांच्या कडून बेळगावातून मुहूर्त काढून घेतला होता .
२९ जुलै सकाळी ९ नंतर ३१ जुलै सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत ,३ आगष्ट रोजी सकाळी १० नंतर आणि ५ आगस्ट असे असे मुहूर्त त्यांनी अयोध्येयाला पाठवले होते त्यातील ५ आगस्ट हा मुहूर्त ठरवण्यात आला होता . पंडित शर्मा यांनी गोवा वेस जानकीहोंड हे तलाव जानकीहोंड म्हनूण प्रसिद्ध होते तिथं पुरातन काळात सीता राम हनुमान यांनी भेट दिली होती.