Friday, April 26, 2024

/

राज्यात 79,765 ॲक्टिव्ह केसेस : बाधितांची संख्या झाली 1.72 लाख

 belgaum

गेल्या 24 तासात राज्यात नव्याने 7,178 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार दि. 8 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,72,102 इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे सध्या राज्यात 79 हजार765 ॲक्टिव्ह केसेस आहेत.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शनिवार दि. 8 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 7,178 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 72 हजार 102 इतकी झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 79,765 असून यापैकी 683 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज शनिवारी 5,006 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 89,238 इतकी झाली आहे. काल सायंकाळपासून आज दिवसभरात कोरोनामुळे आणखी 93 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 3,091 झाली असून यापैकी 8 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

बेळगाव जिल्ह्यात आणखी 302 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5158 झाली आहे. उपचाराअंती पूर्णपणे बरे झाल्यामुळे आज शनिवारी 378 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 1608 झाली आहे. जिल्ह्यात 3456 ॲक्टिव्ह केसेस असून गेल्या 24 तासात जिल्ह्यात आणखी एकाचा बळी गेल्यामुळे मृतांची एकूण संख्या 94 इतकी झाली आहे.

 belgaum

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पांच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 2665 रुग्ण – एकूण रुग्ण 72237), बेळ्ळारी (607-9991), उडपी (313-5918), बेळगाव (302-5158), आणि रायचूर (295-3591)

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या पुढील प्रमाणे आहे. बेंगलोर शहर 328 रुग्ण, धारवाड 45, हासन 41, कलबुर्गी 31, मंगळूर 28, दावणगिरी 27, बळ्ळारी 23, कोप्पळ 18, रायचूर 17, मंड्या 16, गदग 15, चित्रदुर्ग 13, म्हैसूर 12, तुमकुर 12, बिदर 11, बेळगाव 9, हावेरी 7, शिमोगा 5, चामराजनगर 5, चिक्कबेळ्ळापूर 5, उडपी 5, बागलकोट 4, चिक्कमंगळूर 2, कोडगु 2, कारवार 1 आणि विजयपुरा 1 रुग्ण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.