Sunday, April 28, 2024

/

बेळगावात मंगळवारी 181 जण कोरोनामुक्त

 belgaum

राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या बुलेटिन नुसार आज बेळगाव जिल्ह्यात पुन्हा नव्याने २९८ नवे पॉझिटव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर उपचाराअंती १८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे..

आजपर्यंतची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १०५४६ इतकी झाली असून एकूण ६१३९ जण आजपर्यंत कोरोनमुक्त झाले आहेत. त्याशिवाय अजूनही ४२४४ जणांवर उपचार सुरु आहेत. तर जिल्ह्यातील एकूण १६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

याप्रमाणेच राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यातही लाक्षणिक वाढ झाली असून आज राज्यात तब्ब्ल ८१६१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर उपचाराअंती ६८१४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही तब्ब्ल ८२४१० जणांवर उपचार सुरु असून आज राज्यात १४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

 belgaum

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २,९१,८२६ इतकी झाली असून एकूण ४९५८ जणांना आजपर्यंत कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. याव्यतिरिक्त ७५१ जणांवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत एकूण २,०४,४३९ जण कोरोनमुक्त झाले असल्याची माहिती आजच्या हेल्थ बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील मागील काही दिवसातील कोरोना मुक्त रुग्णांचा आकडा

Aug 24 – 150
Aug 23 – 134
Aug 22 – 511
Aug 21 – 192
Aug 20 – 89
Aug 19 – 267
Aug 18 – 495
Aug 17 – 279
Aug 16- 410
Aug 15 – 404

एका दिवसांत सापडलेले सर्वाधिक रुग्ण असे

575 on 11/08/2020
478 on 16/08/2020
395 on 18/08/2020
392 on 07/08/2020
384 on 20/08/2020
379 on 19/08/2020
358 on 15/08/2020 & 20/08/2020
341 on 25/7/2020
334 on 14/08/2020
319 on 24/08/2020
312 on 08/08/2020
311 on 22/08/2020

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.