Saturday, April 27, 2024

/

सुतगट्टी जवळील अपघातात तरुणाचा मृत्यू

 belgaum

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय मार्ग महामार्गावर असणाऱ्या सतगट्टी जवळ अपघात घडला आहे. बेळगाव तालुक्यातील सुतगट्टी घाटात गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात काकती येथील एक युवक ठार झाला आहे. ट्रकने ठोकरल्याने हा अपघात झाल्याचे समजते. ही घटना गुरुवारी रात्री घडली आहे. सुतगट्टी घाटातील राम ढाब्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे

सिद्राय नायक (वय 25 राहणार काकती) असे मृताचे नाव आहे. काही खाजगी कामानिमित्त बाहेर गेला होता. गावी परतताना एका ट्रकने त्याला ठोकरल्याने हा अपघात घडला आहे. त्याचा जागीच मृत्यू झाला असून याप्रकरणी काकती पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्याच्या पश्चात पत्नी आई-वडील असा परिवार आहे. तीन महिन्यापूर्वीच त्याचा विवाह झाला होता. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास तो आपल्या गावी परतत असताना एका ट्रकने त्याला ठोकर दिली. या झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. काकती पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली असून मृतदेह सिविल हॉस्पिटल मधील शवागारात हलविण्यात आला. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

 belgaum

सुतगट्टी परिसरात वारंवार अपघात घडत आहेत. गुरुवारी रात्री हा अपघात पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घडला आहे. या अपघाताने गावावर शोककळा पसरली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.