इथल्या नळाला येत आहे जीव जंतू कृमी मिश्रित पाणी

0
 belgaum

कारभार गल्ली, वडगांव येथे महानगरपालिकेकडून पुरवठा करण्यात येत असलेल्या पिण्याच्या पाण्यात सुक्ष्म जीवजंतू कृमी आढळून आल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच महापालिका आणि पाणीपुरवठा मंडळाने याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

सध्या कोरोना प्रादुर्भावाचा कहर झाला असल्यामुळे शहर व उपनगरांमधील जनतेमध्ये आधीच प्रचंड भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कारभार गल्ली वडगाव येथे नळावाटे येणाऱ्या पिण्याच्या पाण्यामध्ये सूक्ष्म कृमी जीवजंतू आढळून आले आहेत. कोरोनाचा कहर असताना अशाप्रकारे लालसर तांबूस रंगाचे कृमी मिश्रित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा हा प्रकार रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे. या पद्धतीच्या दूषित पाण्यामुळे कॉलरा, कावीळ आदींसारख्या साथीच्या रोगांचा फैलाव होण्याचा धोका आहे.

bg

या पद्धतीची रोगराई मोठ्या प्रमाणात वाढली तर सध्या कोरोनाला रोखण्यासाठी झगडत असलेल्या प्रशासनासाठी ते खूपच त्रासदायक ठरणार असल्याचे मत कारभार गल्ली येथील नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. कारभार गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक एस. व्ही. नाईक यांनी गेल्या पंधरा दिवसापासून या पद्धतीने रोगराईला निमंत्रण देणाऱ्या कृमी युक्त दुषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे सांगितले.

Worms containing water
Worms containing water

कोरोनामुळे आधीच खासगी डॉक्टर रुग्णांना तपासण्यास तयार नाहीत. यात भर म्हणून दूषित पाण्यामुळे जनतेमध्ये कॉलरा, कावीळ सारखी रोगराई पसरली तर त्यांनी कुठे जायचे? असा सवालही कारभार गल्लीवासियांकडून केला जात आहे.

तेंव्हा कारभार गल्ली परिसरात सुरु असलेल्या पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठ्याकडे महापालिका आणि आणि शहर पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी. तसेच आरोग्याच्या हितासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1163386030685655&id=375504746140458

नळाच्या पाण्यात सापडले जीव जंतू(कृमी) -वडगांव येथील नागरिक झालेत त्रस्त-मनपा लक्ष देणार का?

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.