Friday, April 19, 2024

/

शरद पै “आऊट स्टॅंडिंग रोटेरियन” पुरस्काराने सन्मानित

 belgaum

रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे रो. शरद पै यांना 2019 -20 सालचा “सर्वोत्कृष्ट रोटेरियन” पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या अलीकडेच पार पडलेल्या अधिकारग्रहण समारंभात क्लबचे मावळते अध्यक्ष रो. जीवन खटाव यांच्या हस्ते रो. शरद पै याना “आऊट स्टॅंडिंग रोटेरियन” हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी क्लबचे मावळते सेक्रेटरी प्रमोद अग्रवाल नूतन अध्यक्ष रो. डॉ. के. एम. केळुसकर, नूतन सेक्रेटरी रो. गणेश देशपांडे, मावळते असि. गव्हर्नर रो. वीरधवल उपाध्ये, नूतन असि. गव्हर्नर रो. डॉ. मनोज सुतार आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

रो. शरद पै हे गेल्या 30 वर्षापासून रोटरी क्लब ऑफ बेळगावशी निगडीत आहेत. गेल्या 2014 -15 साली त्यांनी क्लबचे अध्यक्ष म्हणून समर्थपणे कार्य केले आहे. त्याचप्रमाणे पै हे रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे डिस्ट्रिक्ट ट्रेनर आणि मॅनेजमेंट ऑफिसर देखील होते. सध्या या रोटरी इंटरनॅशनलने त्यांची रोटरी डिस्ट्रिक्टचे ग्रँट ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल शरद पै यांनी माजी डिस्ट्रिक्‍ट गव्हर्नर रो. अविनाश पोतदार यांचे खास आभार मानले आहेत. रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या प्रत्येक उपक्रमात शरद पै यांचा सक्रिय सहभाग असतो.

 belgaum
rotary club bgm
rotary club bgm

रोटरी क्लब ऑफ बेळगावला मिळालेल्या 1 कोटी रुपयांच्या जागतिक निधीतून एक्वस कंपनीच्या सहकार्याने सुमारे 25 शाळांमध्ये स्वच्छतागृहे बांधणे, हात धुण्याची बेसिन बांधणे, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, बेंचीसची सोय करणे. याच पद्धतीने व्हेगा हेल्मेटच्या सहकार्याने शहरातील दहा शाळांसाठी अन्य एका प्रकल्पांतर्गत मिळालेल्या 75 लाख रुपयांच्या निधीचा विनियोग करणे अशा मोठमोठ्या प्रकल्पमध्ये क्लबला पै यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे पॉलीहायड्रॉन, अशोक आयर्न आणि अन्य मोठ्या कंपन्यांच्या मदतीने बीम्स/ सिव्हिल हॉस्पिटलला लवकरच व्हेंटिलेटर्स आणि कोरोनासह अन्य रोग तपासणी साठीची यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या उपक्रमात देखील शरद पै महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. याखेरीज रोटरी अन्नोत्सव, जीवनावश्यक साहित्यांचे वाटप, कोरोना सहाय्यता कार्य आदी उपक्रम यशस्वी करण्यामध्ये क्लबला शरद पै यांची मोलाची मदत मिळत असते. यंदाचा सर्वोत्कृष्ट रोटेरियन पुरस्कार मिळाल्याबद्दल शरद पै यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.