Thursday, May 2, 2024

/

आमदारांनी केली श्रीनगर येथील रस्त्यासह विकास कामांची पाहणी

 belgaum

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या शहरातील श्रीनगर येथील रस्त्याची पाहणी करून बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी आज सोमवारी तेथील विकास कामांचा आढावा घेतला.

बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी आज सकाळी स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात आलेल्या शहरातील श्रीनगर येथील रस्त्याची पाहणी केली. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत त्या ठिकाणी पूर्ण झालेली विकास कामे त्याचप्रमाणे प्रगतीपथावर असलेली व प्रलंबित असलेली कामे याबाबत बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर यांच्याशी चर्चा केली.

सदर चर्चेप्रसंगी आमदार बेनके यांनी जुनाट धोकादायक झाडे तोडून टाकण्याचा सल्ला देण्याबरोबरच विकासाच्या नावाखाली विनाकारण वृक्षतोड केली जाऊ नये, अशी सूचना केली. विकास कामांतर्गत जास्तीत जास्त झाडे वाचली पाहिजेत तसेच नव्याने वृक्ष लागवड केली जावी, असा सल्ला देखील आमदार ॲड. बेनके यांनी दिला. याप्रसंगी ॲड. एम. बी. जिरली यांच्यासह श्रीनगर परिसरातील स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.